Monday , September 21 2026
Breaking News

हंचिनाळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 

हंचिनाळ (वार्ताहर) : येथे विविध शालेय परीक्षांमध्ये तसेच विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगलदीप इंटरप्राईजेस मार्फत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. कांबळे हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य एम. वाय. हवालदार, गणेश कोंडेकर उपस्थित होते.
प्रारंभी आर. ए. हारदारे यांनी स्वागत. तर यांनी दिंडे यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर मंगलदीप एंटरप्राइजेस मालक श्री. विजय बाळासाहेब सुतार यांच्यामार्फत शालेय साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री. डी. एस. पाटील, आर. के. कांबळे, ए. बी. मुतनाळे, एस. पी. संकपाळ, पुष्पा खोत, सुनील कांबळे, शंकर पाटील, युवा उद्योजक विकास नलवडे, सचिन कोंडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *