राजू पोवार : आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बेळगावात बैठक
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी,पूर परिस्थितीवर इतर कारणामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. अशातच हेस्कॉमचे खाजगीकरण करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बेळगाव येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून कोणत्याही पिकाला हमीभाव दिला जात नाही. यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता सुरू होणार आहे. यावेळी कारखानदारांनी एफआरपी पेक्षा जादा पाचशे रुपये देऊनच उसाची तोड केली पाहिजे. अन्यथा ऊस तोड दिली जाणार नाही. यापूर्वी अतिवृष्टी व महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा निपक्षपतीपाने सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. अनेक शेतकऱ्यांसह सर्वसामान्य कुटुंबीयांची घरे पावसाने पडले आहेत. त्यांना तुटपुंजी मदत न मिळता भरीव मदत मिळावी. यासाठी रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. आता त्याची दिशा ठरली असून सर्व शेतकऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची आवाहन राजू पोवार यांनी केले.
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, एच. बसवराज, शशिकांत पडसलगी, राघवेंद्र नाईक यांनीही चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस शिवानंद मुगलीहाळ, मल्लिकार्जुन रामदुर्ग, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, उमेश भारमल, चिनू कुळवडे, बाळासाहेब पाटील, सुभाष शिरगुर, सर्जेराव हेगडे, सुभाष नाईक यांच्यासह रयत संघटनेचे जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta