भाविकांचे प्रबोधनात्मक मनोरंजन
हंचिनाळ : या जगात प्रत्येक व्यक्तीत देव आहे याचे त्याला जाणीव नाही आणि याचे ज्ञान आले तर प्रत्येक व्यक्तीला देव होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अध्यात्माकडे वळलं पाहिजे तरच मनुष्याच्या जीवनाचे सार्थक आहे. आई वडील संत व सद्गुरु ही आपली खरी माणस आहेत.
पैसा, सत्ता, संपत्ती कामाला येईलच हे सांगता येत नाही मात्र चांगले वागणे मात्र वाया जाणार नाही. याकरता प्रत्येक व्यक्तीने चांगले आचरण करून धर्म वाचविला पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांनी हंचिनाळ येथे भव्य कीर्तन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
येथील फुटबॉल व क्रिकेट मैदानाच्या भव्य मैदानावर संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच श्री. भास्कर पेरे-पाटील यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या गावाचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले की जगाचा विचार करत बसण्यापेक्षा व्यक्तीने पहिल्यांदा स्वतः विकसित होऊन स्वतःचं गाव विकसित झाल्यास देश आणि जग विकसित होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. प्रत्येक व्यक्तीच्या विकासात विरोध होतोच आणि विरोधाशिवाय विकास होत नाही त्यामुळे विरोधाकडे लक्ष न देता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून चौफेर फटकेबाजी करताना उपस्थितांना अक्षरशः हसवत हसवत मनोरंजन आणि समाज प्रबोधन करीत भर पावसातही घाम फोडला.
यावेळी महाराज पुढे म्हणाले की, देहावरचे ममत्व कमी होणे व नामावरची प्रीती वाढवणे म्हणजे भक्ती असल्याचे सांगितले. शेतकर्याला जर आज खर्या अर्थाने स्वाभिमानाने जगायचे असल्यास शेतीबरोबरच शेतीला जोड व्यवसाय म्हणून इतर कोणताही उद्योग करण्यास युवकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. मुलांना मोबाईल पासून दूर राहून व व्यसनाधीनतेपासून तरुणांना वाचवले तरच देशाला भवितव्य असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीकांत चौगुले यांनी केले.
कीर्तनाच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावलेली लावली होती तरीही परिसरातील भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
क्षणचित्रे
इंदुरीकर महाराज कीर्तनाला प्रारंभ केला त्यावेळी पाऊस सुरू होता परंतु इंदुरीकर महाराजांनी पावसाची तमा न बाळगता जोशपूर्ण दमदार आणि उत्साही कीर्तनामुळे पावसानं मधीच ब्रेक घेतला त्यामुळे भाविकांनी कीर्तनाचा उत्स्फूर्तपणे प्रचंड हास्यकल्लोळात प्रतिसाद दिला.
Belgaum Varta Belgaum Varta