निपाणी (वार्ता) : पुणे येथील भारतीय शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा युथ आयकॉन पुरस्कार युवा नेते उत्तम पाटील यांना मिळाल्याने बोरगावसह परिसरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
बोरगाव प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघ, सर्व नगरसेवक, विविध गणेश मंडळे, अरिहंत संस्था, अरिहंत दूध उत्पादक संघ, अरिहंत स्पिनिंग मिल, अरिहंत शिक्षण संस्था, उत्तम पाटील युथ फाऊंडेशन, निपाणीतील विविध गणेश मंडळ, कुन्नूर येथील विविध गणेश मंडळे अप्पाचीवाडी येथे नागरी सत्कार, मराठा समाज, दिगंबर जैन समाज, लिंगायत समाज, मडिवाळ समाज, दलित समाज धनगर समाज यासह विविध संघ संस्थांच्या वतीने ठेवण्याचे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित असते. सर्वांच्या सहकार्यामुळेच आपणास सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळत आहे. साखर कारखानदारीत अरिहंत शुगरच्या माध्यमातून अनेक विधायक कामे हाती घेतली. चार वर्षापासून या कारखान्याच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करीत असल्याने हा युथ आयकॉन पुरस्कारआपणास मिळाला. या पुरस्कारामागे सर्वांचे परिश्रम मोलाचे आहे. यापुढेही असेच सर्वांचे प्रेम व आशीर्वाद या पाटील कुटुंबावर असू दे अशी भावना यावेळी उत्तम पाटील यांनी व्यक्त केली.
प्राथमिक कृषी पतीने सहकार्य संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, राजेंद्र ऐदमाळे, सुमित रोड्ड, सुनीता बंकापुरे, प्रभावती पाटील, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, राजू गजरे, मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी रावसाहेब चौगुले, नगरसेवक अभय मगदूम, अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, डॉ. शंकर माळी, राजूमगदूम, बी.टी. वठारे, मनोज पाटील, बाबासाहेब पाटील, अशो बंकापुरे, बाबासाहेब निकम यांच्यासह संघाचे सदस्य नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta