Tuesday , March 3 2026
Breaking News

सौंदलगा मराठी शाळेत प्रतिभाकारंजी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

 

सौंदलगा (वार्ताहर) : येथील सरकारी मराठी मूलांच्या शाळेत सी आर सी पातळी प्रतिभा कारंजी स्पर्धा अतिउत्साहात पार पडल्या. प्रारंभी कन्नड नाडगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मख्याध्यापक धनंजय ढोबळे आणि प्रास्ताविक संपन्नमुल व्यक्ती रमेश क्षीरसागर यांनी विविध विभागात स्पर्धेचे नियोजन केले आहे. तसेच संयोजकानी मुला-मुलींना गोड जेवणाचेही नियोजन केले आहे. बक्षिस वितरण ज्या त्या वेळी होईल असे आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले. परिक्षकानी पारदर्शक परिक्षण करुन यशस्वी स्पर्धकाची योग्य निवड करावी, असे अमर सुतार यांनी मनोगतात सांगितले. रोपाला पाणी देऊन अध्यक्ष शंकर कदम यांनी मान्यवरांचे उपस्थितीत उद्घाटन केले.

यावेळी महेश गाडीवड्डर, वासू भानसे, अमृत चौगुले, अजित पाटील, संजय पाटील, सागर पवार, दतात्रय बोरगावे, दिलीप शिंदे, अरिफ मुल्ला, उपाध्यक्षा तब्बसुम मुल्ला, सी आर सी मधील सर्व मुख्याध्यापक, परिक्षक, शिक्षक, शिक्षीका, पालक आणि असंख्य विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या सुत्रसंचलन व आभार अनिल शिंदे मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *