जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सूचनेची अंमलबजावणी
निपाणी (वार्ता) : काही महिन्यापासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासंतास खरेदी करीत आहेत. त्यामुळे बस स्थानक परिसर, साखरवाडी, निपाणी मेडिकल आणि कित्तूर चन्नमा चौक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक चंद्रशेखर यांच्या मार्गानुसार मंगळवारी (ता.१३) दिवसभर वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही अंशी वाहतुकीची कोंडी कमी झाल्याने वाहनधारकासह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील सर्वच रस्त्यावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पादचारी व वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. अशातच बस स्थानक जवळील धर्मवीर संभाजी चौकमधील ट्राफिक सिग्नल यंत्रणा पूर्णपणे आहे. तरीही शहर पोलीस ठाण्यातर्फे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दररोज एक दोन पोलिसांची नियुक्ती केली जात आहे. तरीही वाहतुकीची कोंडी सुटलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. येथील बस स्थानक परिसर, निपाणी मेडिकल भाग, कित्तूर चन्नम्मा सर्कल मधील कोंडी लक्षात घेऊन तेथे दिवसभर पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे आता कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यापुढील काळात सर्वच रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन कार्य झाले आहे.
शहरातील सर्वच रस्त्याकडेला चार चाकी वाहनासह दुचाकी वाहने पार्किंग केले जात आहेत. त्यामुळे निपाणी पोलिसांनी सर्वच वाहनावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय अनेक वाहने सिग्नल तोडून दिवसभर ये-जा करीत आहेत. तर अनेक दिवसांसार ट्रिपल सीट घेऊन प्रवास करीत आहेत त्यांच्यावरही कारवाईच्या बडगा उगारला जाणार आहे. मंगळवारच्या कारवाईमध्ये हवालदार के. बी. दड्डी, सुदर्शन आस्की, विठ्ठल चप्पल कट्टी, श्रीशैल यांनी सहभाग घेतला.
———————————————————–
‘वाहनधारकांची संख्या वाढल्याने शहरातील सर्वात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पुढील काळात वाहनधारकांनी आपली वाहने पार्किंग मध्ये लावून सहकार्य करावे. अन्यथा दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जाईल.’
– संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta