निपाणी (वार्ता) : येथील उत्तर कर्नाटक रिक्षा चालक संघटनेचे संचालक व निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांची कर्नाटक राज्य रिक्षा टॅक्सी चालक -मालक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय रिक्षा, टॅक्सी चालक – मालक संघटनेच्या महासंमेलनामध्ये ही निवड केली.
गजानन खापे हे 32 वर्षे रिक्षा व्यवसाय करत असून त्यांनी रिक्षा व्यवसायासोबतच समाजसेवा गोरगरीब रिक्षा चालक चालकांना मदत करण्याचे कार्य सतत चालू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटकातील रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व उपेक्षित अशा रिक्षा चालकांना मदत करण्यासाठी मदत व्हावी, यादृष्टीने देशातील प्रमुख रिक्षा टॅक्सी संलग्न असणार्या नेत्यांनी गजानन खापे यांची कर्नाटक राज्याच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.
खापे गजानन यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये रिक्षा चालकांना एक वेळेला पाच हजार, एक वेळेला तीन हजार असे एकूण आठ हजार रुपयाची आर्थिक मदत राजेंद्र सिंग सोनी तसेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडून मिळवून दिली. खापे यांच्या कार्याचा आढावा घेऊन राजेंद्र सोनी तसेच बाबा कांबळे -पुणे, गफार नदाफ-कराड, नरेंद्रभाऊ गायकवाड- नांदेड तसेच कर्नाटक महाराष्ट्रातील रिक्षाशी संलग्न असणार्या सर्व प्रमुख व्यक्तींचा विचार घेऊन त्यांची एकमताने बहुमताने निवड केली आहे. खापे यांना उत्तर कर्नाटकाचे गौरव गौरव अध्यक्ष रफिक बडेकर-बैलहोंगल तसेच महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व रिक्षाशी संलग्न असणार्या नेतेमंडळींचे सतत मार्गदर्शन सहकार्य लाभले. यापुढेही संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खापे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta