निपाणी (वार्ता) : महादेव गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाने त्यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा केला त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार झाला. त्या अनुषंगाने मुस्लिम समाजातील सेवाभावी व्यक्तिमत्व आणि निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती अल्लाबक्ष बागवान यांचा सत्कार मंडळाचे सदस्य चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी अल्लाबक्ष बागवान हे कायमपणे कोणताही जातीभेद न मानता सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जातात. म्हणून मंडळामार्फत त्यांचा सत्कार केल्या सांगितले. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, व्ही. एस.एम. हायस्कूलचे संचालक संजय मोळवाडे, सदानंद चंद्रकुडे, माजी नगरसेवक सुभाष कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta