बोरगाव येथे सार्वजनिक ठिकाणी जनजागृती
निपाणी (वार्ता) : सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सध्या ग्रामीण भागात चोरींचे प्रकार वाढत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही चोरीच्या घटना वाढत आहेत. अशा चोरी व चोरांपासून नागरिकांनी सावधगिरी बाळगून सतर्क रहावे. याशिवाय लहान मुले पळविण्याच्या अफवा बसविल्या जात आहेत त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. असे काही आढळल्यास त्वरित पोलीस ठाण्याची संपर्क साधावे, असे आवाहन सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. भरतगौडा यांनी केले. बोरगाव येथे रविवार पेठ, बुधवार पेठ, बस स्थानक परिसर. के. एस. पाटील, माध्यमिक शाळा व सरकारी प्राथमिक शाळा अशा विविध सार्वजनिक ठिकाणी पोलीस ठाण्यावतीने जनजागृती करण्यात आली. त्यावेळी भरतगौडा बोलत होते.
परप्रांतीय राज्यात कामासाठी येत आहेत. काही नागरिक वस्तू विकण्यासाठी ही येत आहेत. असे नागरिक चोर असल्याचे सांगून त्यांना मारहाण केले जात आहे. ही बाब चुकीची आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. संशयित व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी ११२ या क्रमांकावर डायल करावा. त्वरित पोलीस आपल्या मदतीसाठी येतील. पण नागरिक परप्रांतीयांना मारणे, त्यांना शिवीगाळ करणे असे करू नये. कोणीही कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे. किंवा व्यक्ती आपल्या गावात गल्लीमध्ये नवीन आढळल्यास जवळच्या ठाण्याची संपर्क साधावे.
घरामध्ये कोणी नसताना अनोळखी माणूस प्रवेश करीत असल्यास तातडीने ११२ या क्रमांकावर संपर्क करावे. सोने पॉलिश करून देतो असे सांगून ग्रामीण भागात अनेक चोरीची घटना घडत आहेत. तरी महिलांनी सावधगिरीने घरामध्ये राहावे. चोरांपासून सतर्क रहावे. रात्रीच्या वेळीही घरामध्ये अनोळखी माणसाला प्रवेश करू देऊ नये. दुकानदार व उद्योगांनी आपल्या दुकानासमोर सुरक्षितेच्या दृष्टीने सीसी कॅमेरा बसवावे. त्याने चोर पकडण्यास मदत होईल, अशी शेवटी भरतगौडा यांनी सांगितले.
यावेळी एस. एस. दोडमणी, मुख्याध्यापक ए. ए. धुळासावंत, नगरसेवक दिगंबर कांबळे, पिंटू कांबळे, अमर शिंगे, तुषार कांबळे, राजू शिंगे, संजय वास्कर, सुरज स्वामी, रमेश कुरळे, अजित कांबळे, शिवाजी भोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta