निपाणी (वार्ता) : मुरगुड नगर परिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मश खुल्या स्केटिंग स्पर्धेत निपाणी येथील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत शाळेच्या एकूण२६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील विविध गटांमध्ये श्रेयस मार्तंड, निनिक्षा जाधव, आर्यन चव्हाण, चिन्मय लोळसुरे, अक्षय पाटील, तनुष देशिंगे, प्रणव पाटील, स्वयं रणदिवे, आराध्या गाडीवर, शिवम पाटील, वेदांत टिंगरे, वेद देवडकर, दया बागडी, ईश्वरी मार्तंड, विराज पवार, आरुष बोंगाडे, पार्थ जाधव, सहारा पठाण, सिमरन धारवाडकर, समृती चोरडे, दुर्वा भोगले, रुद्राक्ष चौगुले, वृंदा शिंदे, श्रेयस दयारकर, हनिया बागवान, समर्थ इंगळे यांनी यश मिळवले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, शामराव घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्कूलच्या आर्यन देशिंगे, प्रणव गाडीवर, सर्व खेळाडूंना प्रशिक्षक इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक डॉ. जोतिबा चौगुले, डॉ. उत्तम पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना चौगुले, सचिव अमर चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta