निपाणी (वार्ता) : येथील आर्किटेक ऑफ इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील ज्येष्ठ अभियंते राजेंद्र पणदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन बोरगावमधील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
प्रारंभी असोसिएशनचे सदस्य व माजी सभापती अजय माने यांनी स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब ऐनापुरे यांनी अभियंते राजेंद्र पणदे यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर राजेंद्र पणदे सपत्नीक सत्कार झाला. अनिता पणदे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळातही असोसिएशनच्या कार्यात आपला सहभाग राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सचिन नाईक, प्रदीप पाटील, सुहास परमणे, शाम कित्तूर, उपाध्यक्ष आसिफ मुल्ला, सचिव अमित रामनकट्टी, अनुप पाटील, चंद्रकांत पाटील, सुहास परमने, अभियंते गजानन वसेदार, डॉ. अरुंधती वाटेगावे, राजेश पाटील अभियंते सी. डी. पाटील, उमेश खोत, धनंजय खराडे, विजयकुमार मेठे, तौशीफ बागवान, सुदेश बागडी, प्रवीण पाटील, प्रमोद जाधव, अनुप पाटील, योगेश घाडगे, प्रशांत शहा, आदर्श कोळकी, अमित तांदळे, ओंकार वरुटे, श्रेयस मेहता, पी. जी. शेंदुरे, अभिजीत जिरगे, काकासाहेब खोत, नवीन बाडकर यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अमित रमणकट्टी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta