कोट्यावधी रुपयाची विकास कामे झाल्यानंतरही सदर वक्तव्य म्हणजे वैचारिक दिवाळखोरी
त्या वक्तव्याचा हंचिनाळ भाजपाच्या वतीने जाहीर निषेध
हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याची त्वरित डांबरीकरणाच्या मागणीसाठी 16 सप्टेंबर रोजी उपोषण कार्यक्रमात एका सहभागी व्यक्तीने भागाचे लोकप्रतिनिधीने रस्त्याचे काम जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. सदर आरोप बिनबुडाचा व राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचा आरोप करण्यात आला. आणि
त्या वक्तव्याचा हंचिनाळ भाजपच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
येथील भाजपा कार्यकर्ते मधुकर चौगुले यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये. प्रारंभी त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना आडी.हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन हवालदार, ज्येष्ठ मार्गदर्शक आर. एल. चौगुले. लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार. माजी उपाध्यक्ष कुमार गुरव संयुक्तपणे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, या भागाच्या कर्तव्यदक्ष. विकास रत्न आमदार सौ. जोल्ले वहिनी व लोकप्रिय खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सत्ता नसतानाही व सत्तेत आल्यानंतरही हंचिनाळ सारख्या लहान गावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये निधी देऊन संपूर्ण गावाचा कायापालट केला आहे. सत्ता येण्यापूर्वी जोल्ले उद्योगसमूहातून पानंद रस्त्यासाठी अडीच लाख, गणेश मंदिर व ब्रम्हनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता व सुशोभीकरण करता देणग्या दिल्या होत्या. तर सत्तेत आल्यानंतर अनेक ठिकाणी बोरवेल व मोटर बसून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढला. विधवा व सर्व समाजातील समाजाला 200 बेगर योजना, दत्त मंदिरासाठी दोन लाख 70 हजार, हनुमान मंदिर साडेसात लाख, मरगुबाई मंदिर चार लाख, कोरबादेवी पाच लाख, गणेश मंदिर दहा लाख, विठ्ठल मंदिर दहा लाख, भक्ती योगाश्रमला दहा लाख, मठ निरंतर ज्योती विद्युत जोडणी साडेतेरा लाख, मठ ते कोगनोळी क्रॉस रस्त्यासाठी एक कोटी सदतीस लाख, गावातील अनेक सीसी रस्ते व डांबरीकरण यासाठी एकत्रित सुमारे अडीच कोटी, कित्तूर राणी चन्नमा वसती शाळेला वीस कोटी, कोरोना काळात गोरगरिबांना मोफत धान्य किट, गवंडी कामगारांना अर्थसहाय, काही मुलींच्या लग्नासाठी आर्थिक 50000 प्रमाणे मदत, काही आजारी लोकांना मुख्यमंत्री सहाय्य निधी मदत, दहा अपंगांना दुचाकी वितरण, मठ आणि माळभागावर, बारा शौचालय आदि बहुतांशी विकास कामे पूर्ण झालेली असताना एखादे काम विलंबित झाल्यानंतर त्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणणे वैचारिक दिवाळखोरी आहे व झालेल्या विकासकामाचा अपमान असल्याचे सांगितले. सदर रस्त्याचे काम होणे गरजेचे असल्याचे आम्ही देखील मानतो. व ते पूर्णत्वाला जाण्यासाठी आमच्या नेत्या प्रयत्नशील आहेत. परंतु त्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष असा शब्दप्रयोग करणे आम्हाला योग्य वाटत नाही.
इतर विकास कामाप्रमाणेच कोगनोळी- हंचिनाळ रस्त्यासाठीही पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन मजबूत रस्ता बांधणीसाठी वहिनी सक्षम आहेत व हंचिनाळ भाजपा कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला गणेश कोंडेकर, अण्णासो मंगसुळे, सिद्धगोंडा वंदुरे, रावसाहेब नलवडे, शिवाजीराव गायकवाड, केशव पाटील, तुळशीदास नलवडे, सागर कांबळे, विक्रम ढाले, कुमार कांबळे, संजय वंदुरे, राजेंद्र सुतार, शिवगोंडा सटवान, युवा उद्योजक विकास नलवडे, गुरुनाथ चौगुले, आप्पासो चौगुले, वासुदेव भिवसे, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.