नवरात्र नियोजन बैठक संपन्न
कोगनोळी : कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव सर्व गावकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करु, मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, भाविकांना दर्शनाची सोय व्यवस्थित व्हावी, नवरात्र काळात होणाऱ्या आरती वेळी मंदिर परिसरात वाहनांना येण्यास बंदी करावी. या ठिकाणी येणारे फळ विक्रेते यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून बसण्याची सोय करावी यासह अन्य सूचना माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी दिल्या.
कोगनोळी तालुका निपाणी येथे वीर सदन निवासस्थानी नवरात्र उत्सव नियोजन बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील उपस्थित होते.
के. डी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी आप्पासाहेब खोत, दिलीप पाटील, संदीप चौगुले, संजय पाटील, प्रकाश गायकवाड, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गुरव यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली.
यावेळी पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले, अनिल पाटील, सी. के. पाटील, बशिर गडवाले, जहांगीर कमते, बाळासाहेब गुरव, सुरेश गुरव, रामचंद्र गाडेकर, सुकुमार वडर, अनिल गुरव, राजगोंडा चौगुले, जिनगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, महेश जाधव, संभाजी पाटील, बाबासाहेब पाटील, बाबूराव आवटे, अनिल कोरवी, रामचंद्र कागले, प्रविण भोसले, प्रकाश पोवार, तात्यासाहेब कागले, बापूसाहेब सुर्यवंशी, केशव पाटील, धनंजय पाटील, दादासाहेब मानगावे, पुनम डांगरे यांच्यासह मानकरी, गुरव, सेवेकरी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta