Saturday , September 21 2024
Breaking News

नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा विजय 

Spread the love
रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत मंडप शुभारंभ
निपाणी(वार्ता) : नवरात्रोत्सव हा अतिशय प्राचीन सण असून याला भारतात अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा झालेल्या विजयाचे प्रतीक आहे. हा नवरात्रोत्सवात तुम्हा सर्वांवर दुर्गा मातेची कृपादृष्टी राहावी, हीच प्रार्थना असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले.
येथील शिवमहाराणा ग्रुप नवरात्र उत्सव मंडळ घिसाड गल्ली येथील मंडपाचे पूजन करून ते बोलत होते. यावेळी रत्नशास्त्री मोतीवाला यांच्या हस्ते मंडपाचे पूजन करून मंडप उभारणीला सुरवात करण्यात आली.
मोतीवाला म्हणाले, नवरात्रोत्सवात नऊ दिवस देवीची पूजा करतो. देवीने प्रतिपदा ते नवमी या काळात महिषासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला. म्हणून हे व्रत आपण करतो. आपणही आपल्या आयुष्यात राग, मत्सर, द्वेष या राक्षस रुपी वृत्तीचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळविणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे आपण नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतो त्याचप्रमाणे आमच्या शुभरत्न केंद्रात नऊ ग्रहांचा अभ्यास केला जातो. आणि नऊ ग्रहांच्या अभ्यासानुसार मनुष्याला सुखी जीवनाचा मंत्र देतो. नवरात्रीच्या नऊ दिवसात आपणाला आध्यत्मिक बळ मिळो.
यावेळी रमेश शेलार, सुनील शेलार नगरसेविका राणी शेलार, रोहित वैद्य मंडळाचे अध्यक्ष नरेश शेलार, उपाध्यक्ष चेतन गिरी, खजिनदार बाबू कळसकर, सुनील चव्हाण, कुमार चव्हाण, शेखर शेलार, विकास शेलार, महेश कांबळे, बबलू करवी, अनिकेत कळस्कर, वैभव कळसकर, अभिजीत शेलार, उमेश शेलार, विशाल शेलार, विजय कळसकर, नरेंद्र चव्हाण किशोर बिद्रे, संतोष आडवाणी, अभी खोत, गिरीश मोहिते, रोहित कांबळे, दीपक गायकवाड, चेतन शेलार, प्रथमेश चव्हाण, ओमकार रजपूत, सौरभ इंगळे, संजय शेलार, विजय शेलार, राहुल नंदगावकर, अल्ताफ मुल्ला, भूषण खैरे, चेतन चव्हाण, सचिन पवार, राज इंदुलकर प्रसाद परीट व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *