Wednesday , March 4 2026
Breaking News

ब्रह्मनाथ सौहार्दला 1.81 कोटीचा नफा

Spread the love

 

अध्यक्ष बाहुबली हरदी : 33 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : सभासद, ठेवीदार, ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. चिकोडी येथे नुतन शाखा स्थापन करण्यात येत आहे. संस्थेला अहवाल सालात 1,81,40,138 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर, सभासदांना सर्वाधिक 25% लाभांश वितरीत करण्यात आले आहे. कर्जावरील व्याजदरही कमी करण्यात आले असून संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक पत मिळवून देण्याचे काम केल्याचे संस्थेचे अध्यक्ष बाहुबली हरदी यांनी सांगितले.
येथील श्री ब्रह्मनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
दिपप्रज्वलन, आरतीने सभेला सुरुवत  करण्यात आली. दिवंगत सभासद, संचालक व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेश बनवन्ना 33 वर्षात संस्था राष्ट्रीय स्तरावरील सर्व सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
विषय पत्रिका वाचन रव्यवस्थापक सुनील घाळी यांनी केले. टाळ्यांच्या गजरात सभासदांनी त्यास मान्यता दिली. यावेळी कायदा सल्लागार ऍड. एम. व्ही. कुलकर्णी, पारस देसाई, शांतिनाथ हरदी, राजेंद्र डोंगरे, धन्यकुमार कित्तूर, जिनेश्वरी कोगनोळे, संकष्टी शिंपूकडे, संस्कृती लोखंडे, अमित उपाध्ये, प्राजक्ता मालगावे, अंकित कंगळे, संगीता लोखंडे यांच्यासह नुतन संचालक, मान्यवर, संस्थेचे कर्मचारी व होतकरू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोगनोळी शाखेस सर्वोत्कृष्ट शाखा पुरस्कार देण्यात आला. जहांगीर सय्यद यांना सर्वोत्कृष्ट शाखा व्यवस्थापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी नगरसेवक पठाडे, आर. जे. खोत व सभासदांनी मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संचालक रायगोंडा पाटील, महावीर बागणे, वैशाली देशमाने, ज्योती गुंडे, वसंत कांबळे, सुधाकर गोडबोले, अशोक पुरंदर, डॉ. संतोष चौगुले, अमर उत्तुरे, पारस देसाई, सुमेर मार्गाने, अ‍ॅड. एम.व्ही. कुलकर्णी, अ‍ॅड. एस. एस. बन्ने, दिलीप पठाडे, केतन बोरगांवे, विजय गोरे, महादेव संकपाळ, हरीष मातीवड्डर, शीतल खोत, राजु पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. माणिक कोल्हापूरे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली देशमाने यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *