कोगनोळी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग यांच्यावतीने गजबरवाडी, भिवशी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले.
गजबरवाडी शाळेमध्ये यावेळी मराठी शाळेत विध्यार्थी संख्या घटत का चालली याबद्दल युवा समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी भाषा किती महत्वाची आहे हे स्पष्ट शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकानी आपली मते मांडली. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन यशस्वी होण्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत. तरी यासाठी पालकांनी मनातील शंका असतील तर आम्हाला विचारलं पाहिजे त्यांचे निरसन आम्ही करू ही ग्वाही दिली.
कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व सदस्य, युवा समितीचे प्रमुख कार्यकर्ते बंडा पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निवृत्त सर्कल मेस्त्री साहेब, सौन्दलगे, दादासाहेब जगताप, आदेश पोवार, कृष्णात सासमिले, लक्ष्मण कुळवमोडे, गावातील प्रतिष्टीत गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta