कोगनोळी : मानकापूर तालुका निपाणी येथील पत्रकार बबन अण्णासो जमादार यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
बबन जमादार यांनी आपल्या हलाक्याच्या परिस्थितीत देखील समाजकार्याची जोड दिली आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट समाजसेवक म्हणून काम करून नावलौकिक केला आहे. त्यांचा आदर्श इतर लोकांनी घेण्यासारखा आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने त्यांना आदर्श पत्रकार प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
हा पुरस्कार रविवार तारीख 25 रोजी गोवा येथील पणजी येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना देण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta