चार दिवस विविध कार्यक्रम : विविध साधू संतांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : कुन्नुर येथील सद्गुरु स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव शुक्रवार (ता. 23) ते सोमवार (ता. 26) अखेर होणार आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यावेळी अनेक साधुसंतांची उपस्थिती राहणार आहे.
शुक्रवारी (ता. 23) सकाळी आठ वाजता अकोळ येथील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ध्वजारोहण होणार आहे. दुपारी तीन वाजता कुन्नूरमधील अंजनी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी पाच वाजता विठ्ठल सांप्रदायिक हरिपाठ मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांचे शेतकर्यांना मार्गदर्शन, सात वाजता रामचंद्र कुलकर्णी यांचे प्रवचन रात्री दहा वाजता हनुमान भजनी मंडळ आणि लिंगनूर- कापशी येथील पंत भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता.24) सकाळी आठ वाजता गुरुचरित्र अध्याय पठण, सकाळी अकरा वाजता प्रसाद, दुपारी तीन वाजता माऊली भजनी मंडळाचा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता विठ्ठल सांप्रदायिक हरिपाठ मंडळाचा हरिपाठ सात वाजता एम. पी. पाटील कावणे यांचे प्रवचन रात्री आठ वाजता प्रसाद, रात्री दहा वाजता कुंभार भजनी मंडळ, वीरभद्र भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी (ता.25) सकाळी आठ वाजता भाऊसाहेब पाटील महाराज उमळ वाडकर यांच्या हस्ते ध्वनी प्रज्वलित होणार आहे. त्यानंतर रावसाहेब सुतार, प्रथमेश सुतार, भरत सुतार यांच्या वाड्यातून श्रींच्या पादुका पालखी मिरवणुकीने विठ्ठल मंदिरात समाधी स्थळी आणून अभिषेक व वस्त्र अर्पण होणार आहे. दुपारी बारा वाजता महाप्रसाद, तीन वाजता भजन कार्यक्रम, पाच वाजता हरिपाठ, सायंकाळी सात वाजता जळगाव येथील प्रा. गणेश शिंदे यांचे प्रवचन, कौलगे, अकोळ, पांगिरे -बी, सुळकुड, खोतवाडी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी (ता.26) सकाळी आठ वाजता विजयराव जाधव यांच्या हस्ते घटस्थापना, भजन नामस्मरणात समाधीवर पुष्पष्टी व भजन सेवा होणार आहे. दुपारी साडेअकरा वाजता आडी येथील परमात्माराज महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्तयाग व प्रवचन कार्यक्रम, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ रात्री आठ वाजता मौजे वडगाव येथील आबासाहेब देसाई महाराज यांचे प्रवचन रात्री साडेनऊ वाजता हनुमान व कुंभार भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.