नगरसेवक विलास गाडीवड्डर : शिवप्रताप प्रदर्शनापूर्वीचा थरार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उत्तम पाटील व युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती इतर काळात सर्वसामान्यांना मदतीचा हा दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे येथील साखर उद्योगातर्फे उत्तम पाटील यांना युथ आयकॉन पुरस्कार देऊन पुणे येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. आता हे पाणी मतदारसंघातील नागरिकातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (ता.२४) सायंकाळी ५ वाजता श्रीक्षेत्र तवंदी येथील ब्रम्हनाथ सभागृहामध्ये राजकारण विरहित सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीचा थरार दाखविण्यात येणार आहे यावेळी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेवक विलास गाडीड्डर यांनी केले आहे. यावेळी युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकार रत्न रावसाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि कोरोना काळात शेतकऱ्यासह सर्वसामान्य कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. याशिवाय साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. याशिवाय अरिहंत स्पिनिंग मिल व इतर उद्योग व्यवसायातून सर्वसामान्यांच्या हाताला काम दिले आहे. तरुण वयातच त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये गरुड झेप घेतली आहे. अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था, अरिहंत प्राथमिक कृषी पतीन बँक, अरिहंत दूध उत्पादक संघ अशा अनेक प्रकारच्या संस्थांमधून उद्योग व्यवसायिकांना पत मिळवून देण्याचे काम केले आहे अशा अनेक कल्याणकारी कामाचे दखल घेऊन उत्तम पाटील यांना पुणे येथील साखर उद्योगातर्फे युथ आयकॉन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सत्कार समारंभनंतर ‘शिवचरित्र आणि आजचा युवक’या विषयावर खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक संजय सांगावकर, डॉ. जसराज गिरे, अनिस मुल्ला, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, निरंजन पाटील-सरकार, बंडा पाटील, निवास पाटील, अरूण निकडे, के. डी. पाटील, ॲड. अमर शिंत्रे, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, लक्ष्मण आबणे, किसन पोटले, प्रकाश गायकवाड, इमरान मकानदार,बाळासाहेब पाटील, प्रविण पाटील, गजानन कावडकर, लक्ष्मण नेजे, अभिजित कौंदाडे, सचिन खोत, शिरीष कमते, शिवाजी चौगुले, अमित शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta