निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संवर्धन संस्थेतर्फे संस्थेच्या उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले. उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून निपाणी शाखेचे राजेंद्र बन्ने यांचा युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांना उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून उत्तम सेवक म्हणून सुनील मेलगिरे, शांतिनाथ बेडकीहाळे यांची घोषणा केली. त्यांचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र व शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच तसेचयुवा नेते उत्तम पाटील यांना पुणे येथील साखर उद्योगातील युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा, दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुजय पाटील, उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, संचालक जयगोंडा पाटील, अक्षयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, सतीश पाटील, बाबासाहेब आपराज, श्रीकांत वसवाडे, निर्मला बल्लोळे, अजित कांबळे, मुख्य व्यवस्थापक ए. जे. बंकापुरे, एस. के. तेरदाळे, राजू पाटील- अकोळ, अरुण निकाडे, महेश पाटील, सुंदर पाटील, अशोक पाटील, बंडा पाटील, निवास पाटील, के. डी. पाटील,शिरीष कमते, इम्रान मकानदार, प्रकाश गायकवाड, निरंजन पाटील, शिवाजी रानमाळे, रोहन भिवशे, इंद्रजीत पाटील, शरदचंद्र पाठक, मलकारी तेरदाळे, शंकर माळी, चेतन स्वामी, आर. टी. चौगुले, प्रकाश जंगटे यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले. तर नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta