कोगनोळी : नजीकच्या पुणे बेंगलोर महामार्गावर सौंदलगा तालुका निपाणी येथील दिलिप सांगावे यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उशिरा रुग्णवाहिका आल्याने युवकाचा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असा आरोप कर्नाटक राज्य युवा सेनेने केलला आहे.
इथुन पुढे कोणताही असा प्रशासनाचा भोंगळ कारभार होऊ नये. महामार्गावर अपघात झाला तर तात्काळ त्याठिकाणी रुग्णवाहीका उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य युवा सेनेच्या वतीने निपाणी तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी बोलताना कर्नाटक राज्य युवा सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब हादीकर म्हणाले, सौंदलगा येथील युवकाचा ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी उपस्थितानी 108 व 112, या नंबरवर फोन केले होते. पण तासभर होऊनही रुग्णवाहीका आली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये. त्याचबरोबर महामार्गावरील कोगनोळी टोल वरती कायमस्वरूपी रुग्णवाहीका ठेवण्यात यावी म्हणून सदर निवेदन देण्यात आले असल्याचे सांगितले.
निवेदन उपतहसीलदार अभिजित भोंगाळे यांनी स्विकारुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कोगनोळी टोल येथे रुग्णवाहिका उपलब्ध करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा टोल प्रशासनाला दिला.
याप्रसंगी कर्नाटक राज्य युवा सेना निपाणी तालुकाध्यक्ष सचिन इंगवले, कार्याध्यक्ष करण शिंदे, अभिजित शिंत्रे, अदित्य पाटील, विवेक पाटील, वैभव पाटील, गुरु पाटील, सुशांत पाटील, मायाप्पा भानसे, प्रवीण चव्हाण, अभिजित पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta