संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड हंचिनाळ या संस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कुंभार हे होते.
प्रारंभी संस्थेचे माजी चेअरमन श्री. अनिल कुरणे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले की. ग्रामदैवत ब्रह्मनाथ देवाचा आशीर्वाद, आणि सर्व दूध उत्पादक, सर्व शेतकरी, सभासद आणि कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे मागील 29 वर्षात संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली असून संस्थेची एक कोटी नऊ लाख 29 हजार 519 रुपये मालमत्ता असून भविष्यात संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. संस्थेचा आदर्श घेण्यासारखी संस्था चालवले असल्याचे सांगितले.
तर यावेळी अरुण पाटील म्हणाले की, संस्थेने सर्वांच्या सहकार्यामुळे. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत संस्था सर्वोत्तम प्रगती पथावर असल्याचे सांगितले.
अहवाल वाचनात संस्थेचे सेक्रेटरी दत्तात्रय पोवार म्हणाले की. अहवाल सालात संस्थेने दोन लाख 64 हजार 238 लिटर दूध संकलन केले असून दोन कोटी 67 लाख 85 हजार 318 रुपयाची उलाढाल केली असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुंभार म्हणाले की, संस्थेने निस्वार्थी. स्वच्छ कारभार करून सभासदांचे हित जोपासल्याचे सांगितले.
या सभेला संस्थेचे चेअरमन विजय कुरणे, व्हाईस चेअरमन नवनाथ चौगुले, संचालक दीपक पाटील, आनंदा भरमगोंडा चौगुले, आप्पासो पाटील, संजय कोंडेकर, राहुल पंचम, संदीप कुंभार, प्रकाश ढाले, सौ. मंगल मजगे, सौ. शांताबाई नलवडे, संस्थेचे माजी चेअरमन अनिल कोंडेकर, धोंडीराम मजगे, मलगोंडा गवळी, दिनकर कोंडेकर, संजय हवालदार, यशवंत चौगुले, वसंत पंचम, कालगोंडा मजगे, अशोक नलवडे, बाळकृष्ण चौगुले, सात गोंडा कानडे, एस के बस्तवडे, बाळासो सुतार, आनंदा चौगुले, भीमसेन चौगुले, राजाराम कोंडेकर, सुभाष कोंडेकर,बाबुराव नलवडे, बाळासो कांबळे, यांच्यासह गावातील विविध संस्थांचे मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta