Saturday , October 19 2024
Breaking News

अमलझरी येथे इंडियन ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 


निपाणी : निपाणी जवळच असणाऱ्या अमलझरी गावात नवरात्रोत्सवानिमित इंडियन ग्रुपच्या वतीने सौभाग्यवतीचा सन्मान असणारा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, प्रथमतः दुर्गा माता मूर्तीची विधिवत पुजा करून ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव खोत, सुविध्य पत्नी व परिवार यांचेकडून देवीची आरती करण्यात आली.

आरती झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांना खजूर, केळी प्रसाद म्हणून वाटण्यात आला, त्यानंतर गावातील हळदीकुंकू कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन प्रेमळ पवित्र भावनेने हळदीकुंकू कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. महिलांना भेटवस्तू म्हणून या ग्रुपने तब्बल 300 पणत्या भेट दिल्या. त्यानंतर सर्व महिलांनी संगीताच्या तालावर ताल धरत दांडियाचा मनमुरादपणे आनंद लुटला. या दांडिया खेळामध्ये स्त्रिया, मुली, बालचमू तसेच इंडियन ग्रुपचे कार्यकर्ते उत्साहाने मंत्रमुग्ध होऊन भक्तिभावाने दांडिया खेळण्यात रमले होते.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी अध्यक्ष महेश खोत, राजेंद्र खोत, गणेश खोत, विजय खोत, अक्षय खोत, सौरभ खपले, शुभम खोत, बचू खोत, शुभम सुरेश खोत, सतीश खोत, ओंकार खोत, प्रमोद खोत, रवींद्र डाफळे, सागर खपले, प्रथमेश कदम, प्रफुल कदम, सुहास खोत, बब्बू कदम, सुरज कदम, आशिष खोत, आकाश खोत व ग्रुपचे ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, मित्रमंडळी यांनी परिश्रम घेतले. शेवटी महेश खोत यांनी सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *