निपाणी : समाजाला दिशा देण्यासाठी दिवंगतशिवाजी बिरनाळे फाउंडेशनसारख्या सामाजिक माध्यमांची गरज आहे. आज समाजामध्ये हजारो लोक मदतीसाठी आतुरलेले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे ही गरज आहे. त्यामुळे सामाजिक सेवा करणाऱ्या सर्वच लोकांनी याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजसेवा ही ईश्वराची सेवा आहे, असे मत शुभरत्न केंद्रचे सर्वेसर्वा रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले.
मांगुर येथील शिवाजी बिरनाळे सामाजिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला सामाजिक सेवा संस्थेच्या व शुभरत्न केंद्राच्यावतीने होत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ए. एच. मोतीवाला यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारानंतर ते बोलत होते.
व्यासपीठावर वीरेंद्र माने सरकार, जयदीप माने सरकार, रमेश जाधव अण्णा जळणे, बबन पाटील, कुमार बने, सचिन बोधले, धनराज राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
ए. एच. मोतीवाला पुढे म्हणाले की, गौरी गणपती आरास सजावट स्पर्धा शिवाजी बिरनाळे फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धा घेतल्याने समाजामध्ये परिवर्तन होण्यास मदत होते. या संस्थेचे तानाजी बिरनाळे व विशाल सुतार यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. तानाजी बिरनाळे व विशाल सुतार या दोघांनी असंख्य लोकांना मदत मिळवून देण्यासाठी हे माध्यम तयार केले आहेत. स्वर्गीय रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमांतून आम्हीही समाजसेवा करत असतो. शेकडो लोकांना मदतीचा हात पोहाचविन्यात आमच्या संस्थेला यश आले आहे. यापुढे शिवाजी बिरनाळे सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गरजूंना लागणारी मदत पोहोचवण्यासाठी शुभरत्न केंद्र व मोतीवाला फाउंडेशन प्रयत्न करणार आहे. यावेळी मान्यवर शेकडो ग्रामस्थ, स्पर्धक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta