लोकायुक्तची कारवाई : परवाना देण्याचे काम सुरू
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ कार्यालयावर लोकायुक्त यांनी शुक्रवार तारीख 30 रोजी पहाटे धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. या कार्यालयाविषयी वाहनधारकांच्यात तीव्र नाराजी पसरली होती.
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आधी सह अन्य राज्यातून 24 तासांमध्ये सुमारे सात ते आठ हजार वाहनधारक कर्नाटकात प्रवेश करत असतात. प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांची या ठिकाणी कागदपत्राची तपासणी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याने लोकायुक्त यांनी कारवाई केली.
पहाटेच्या सुमारास अचानक लोकायुक्त यांनी धाड टाकून कारवाई केल्याने येथील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. अधिकारी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.
या कारवाई मध्ये सुमारे चार लाख रुपये या ठिकाणी सापडले आहेत.
शुक्रवार तारीख 30 रोजी पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोकायुक्त यांनी ठिकाणी असणाऱ्या कागदपत्रांची तपासणीची कारवाई सुरू ठेवली होती.
झालेल्या या लोकायुक्त कारवाईमुळे अनेक शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
शुक्रवार तारीख 30 रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवार तारीख एक रोजी दिवसभर येथील कार्यालय बंद असून या ठिकाणी फक्त तात्पुरता परवाना देण्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. शुक्रवार तारीख 30 रोजी दिवसभर कारवाई सुरू असल्याने तात्पुरता परवाना काढणाऱ्या अनेक वाहनधारकांना दिवसभर थांबून राहावे लागले होते. ऑफिस बंद असल्याकारणाने या ठिकाणी होणारी 24 तास वाहनांची गर्दी तुरळक झाली आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणारे वाहनधारक आरटीओ कार्यालयाजवळ आपली वाहने उभा करून कागदपत्राची तपासणी करण्यासाठी येत असताना या ठिकाणी असणारे होमगार्ड कार्यालय बंद आहे असे सांगत आहेत. यामुळे वाहनधारक कार्यालयाजवळ येऊन परत जाऊ लागले आहेत.
काल झालेल्या लोकायुक्त यांच्या कारवाईची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta