
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची माहिती : पन्नास हजार भाविक येण्याची शक्यता
कोगनोळी : कर्नाटक, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्या कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा जागर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार तारीख 3 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करून पालखी सोहळा सुरू होणार आहे. पालखी सोहळ्यात बिरदेव अश्व, बिरदेव पालखी, अंबिका देवीची पालखींची गावातून प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी 1 वाजता अंबिका मंदिराजवळ पालखी मिरवणूक आल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम, वालंग, हेडाम खेळविणे यासह अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गावातील व बाहेर गावाहून येणार्या भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. बाहेर गावाहून येणार्या भाविकांच्या वाहनासाठी हायस्कूलच्या पटांगणात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पालखी प्रदक्षिणा मार्गावर नागरिकांनी गर्दी करू नये, सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवीच्या जागर सोहळ्याच्या नियोजनानिमित्त मंदिराजवळ बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. त्याचबरोबर जागर सोहळ्यानिमित्त येणार्या व्यापार्यांना बसण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोय केली आहे. यासह अन्य सुविधांबद्दल माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, मानकरी अशोक मगदूम, आप्पासाहेब मगदूम, संजय पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, तात्यासाहेब कागले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, अभिजीत पाटील, प्रकाश गायकवाड, युवराज कोळी, संजय गुरव, सुरेश गुरव, नंदकुमार गुरव, संजय डूम, ब्रम्हनाथ चौगुले, संभाजी पाटील, अनिल पाटील, विठ्ठल कोळेकर यांच्यासह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta