युवा नेते उत्तम पाटील : बोरगावमध्ये गांधी जयंती
निपाणी (वार्ता) : सत्य आणि अहिंसा मार्गावर निरंतरपणे लढा देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याशिवाय मिठाचा सत्याग्रह केला. त्यांच्या पदस्पर्षाने निपाणी तालुका पावन झाला आहे. अलीकडच्या काळात भ्रष्टाचार व इतर कारणामुळे महात्मा गांधींचे विचार बाजूला पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यासह युवकांनी महात्मा गांधीजींचे गुण घेणे आवश्यक आहे. देशाला सध्या महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज आहे, असे मत युवा नेते व बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील पिकेपीएसमध्ये रविवारी आयोजित गांधी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी पिकेपीएसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. दरम्यान सकाळी पिकेपीएस परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या विविध शाखामध्ये महात्मा गांधी जयंती साजरी झाली.
यावेळी पिकेपीएसचे संचालक प्रदीप माळी, सुमित रोड्ड, राजेंद्र ऐदमाळे, अण्णासाहेब बंकापुरे, दर्शन पाटील, रावसाहेब चौगुले, सुनीता बंकापुरे, प्रभावती पाटील, राजेंद्र पाटील मायगोंडा पाटील, शीतल हावले, अजित वसवाडे यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta