Tuesday , March 3 2026
Breaking News

कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात

Spread the love

 


हजारो भाविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक
कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. सोमवार (तारीख 3) जागर सोहळ्यानिमित्त कर्नाटक, महाराष्ट्रातून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी 8 वाजता देवीची आरती करून सजविलेली पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली, पी ऑन्ड पी सर्कल, मगदूम गल्ली, माळी गल्ली अशी भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र दुतर्फा रांगोळी व पुष्पवृष्टीे करण्यात आली होती.
अंबिका मंदिरासह गांवातील विविध मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. माजी उर्जा मंत्री वीरकुमार पाटील, तालूका पंचायत सदस्य प्रितम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, योगेश पाटील, अतुल कुलकर्णी, सी के पाटील, अमर पाटील, अनिल चौगुले, आप्पाासाहेब मगदूम, अशोक मगदूम आदीच्या उपस्थित आरती करण्यात आली.
या मिरवणूकीत बिरदेव पालखी व अश्वाचा समावेश होता. पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून मंदिराजवळ आल्यावर अश्वासह, पालखी मानकरी यांनी धावत जावून मंदिर प्रदक्षिणा घेतली. यावेळी वालंग झाला. मानाचे हेडाम खेळविणे कार्यक्रम झाला. रात्री 12 वाजता मान्यवरांच्या उपस्थित आरती झाल्यावर पालखी मंदिर प्रदक्षिणा झाली.  देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडण्यात आले.
मंदिरात सुरेश गुरव, बाळासो गुरव, संजू गुरव, अशोक गुरव, सतिश गुरव, नंदकुमार गुरव, चंद्रकांत गुरव, सचिन गुरव यांच्याकडून देवीची वेगवेगळया रूपात पुजा बांधण्यात आली होती.
देवीच्या‍ जागर सोहळयास मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, सांगली, सातारा, बेळगाव, चिक्कोडीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *