कोगनोळी : येथील लाखो जणांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन कर्नाटक राज्य धर्मादाय हाज वक्फ मंत्री शशिकला जोल्ले व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले. श्री अंबिका देवीची ओटी भरून गोरगरिबांच्या हितासाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार फंडातून मंजूर करून दिलेल्या अंबिका भवनच्या कामकाजाची पाहणी केली. कोणत्याही प्रकारची कमतरता भासल्यास लगेच आम्हाला कळवावे अश्या सूचनाही कोगनोळी भाजपाप्रमुख कुमार पाटील व कार्यकर्त्यांना दिल्या. प्रसंगी भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार व त्यांच्या पोलीस टीम कडून चांगले नियोजन करण्यात आले होते. यावेळी कोगनोळी भाजपा प्रमुख कुमार पाटील, बिरेश्वर संचालक विलास नाईक सर, अरुण पाटील सर, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, वंदना चौगुले, स्वाती शिंत्रे, विद्या व्हटकर, राजेश डोंगळे, बबलू पाटील, विजय पाटील, वैभव पाटील, प्रितम शिंत्रे, सचिन निकम, अजित पाटील, जीवन नाईक, रंगराव कागले, शकील नाईकवाडे, ओंकार हंचिनाळे, रावसाहेब खोत, कुमार व्हटकर, मारुती पुणेकर, किशोर व्हटकर, रणजीत व्हटकर यांच्यासह कोगनोळी परिसरातील भाविक भक्त, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta