निपाणी (वार्ता) : स्टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशन कोल्हापूर यांच्यावतीने शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणीत व्हॉलीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.
व्हॉलीबॉल संघात आदित्य जाधव, श्रेयश तोंदले, प्रणव लोहार, श्रेयश रजपूत, शुभम हजारे, शंतनू रेपे, सुयश पाटील, सर्वेश देवनहळ्ळी, निखील शेवाळे, रुद्र ढोले, साई नागराळे, साहिल तुरंबेकर, तर खो खो संघात श्रीकेश खवरे, प्रथमेश सूर्यवंशी, युगंधर माने, मृणाल खोत, रोहन खवरे,अथर्व पाटील, यश ठाणेकर, सौरभ चेचर, अथर्व खवरे, प्रवीण खोत, संघर्ष नाईकवाडे, पृथ्वीराज इंगवले या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावली. 16 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
शिरगुप्पी येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अथर्व डाफळे याने 5 कि.मी. धावणे मध्ये प्रथम तर 1500 मीटरमध्ये अथर्व देसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक ए. एच. आळवे व व्ही. व्ही. पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, यांच्यासह सर्व संचालक पदाधिकार्यांचे प्रोत्साहन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta