निपाणी (वार्ता) : गेले अकरा दिवस चालू झालेली दुर्गामाता दौड विजयादशमी दिवशी सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सप्त नद्याचे पाणी आणून ओंकार शिंदे, प्रसाद परीट,वैभव कळसकर, प्रणय दवडते, राहुल नंदगावकर, उत्तम कामते, साहिल कांबळे, प्रकाश इंगवले, प्रथमेश पाटील, प्रवीण भोसले, आशिष भाट यांच्या हस्ते शिवमुर्तीला जलभिषेक घालण्यात आला. तिथून श्री दुर्गामाता दौडला सुरवात झाली. शिवराष्ट्र धर्म संगठना यांनी भव्य असे दुर्गामाता दौडीचे स्वागत केले. तसेच दुर्गामाता दौडीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी परंपारिक वेशभूशात सहभाग दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेषभुषा विजय बुरुड यांनी साकारली होती.
मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळ यांच्याकडून सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले. ट्रबलरज ग्रुप यांच्याकडून प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पांडुरंग भोई, विनायक वड्डे, ओंकार शिंदे, सुनील शेलार, नितीन साळुंखे, अतुल शिंदे, विशाल घोडके, रुपेश तोडकर, अनिकेत विटेकरी, अभिषेक भोई, आमर गाडीवड्डर, ऋषिकेश सौंदलगेकर, सुहास हसूरे, महेंद्र खोत यांच्यासह उपस्थित होते. आशिष भाट यांनी मनोगत व्यक्त करुन दौडीची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta