हंचिनाळ (वार्ताहर) : येथील गणेश मंदिराच्या भोजनालय व समुदाय भवनांच्या शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव गणेश मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष मधुकर निंगूराम चौगुले हे होते.
येथील वार्ड नंबर एक मध्ये गणेश मंदिर असून तेथे समुदाय भवनाची आवश्यकता होती याची दखल घेऊन कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून दहा लाख रुपये अनुदान मंजूर झाले होते. त्या अनुदानातून समुदाय भवन व भोजनालयाचे काम सुरू असून त्यावर आज स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी मधुकर चौगुले यांनी स्वागत केले. त्यानंतर संगीता चौगुले, अक्काताई हवालदार, शालन मंगसुळे, अनिता गुरव, सुनिता चौगुले, सविता पाटील, मंगल चौगुले, कलावती नलवडे, यांच्यासह वीर शिव गणेश मंदिर सेवा समितीचे सदस्य श्री. आनंदा चौगुले (बिडी), गिरीश गुरव, भीमराव चौगुले, एम. वाय. हवालदार, रावसो नलवडे, शिव गोंडा सटवाण, सिद्धू वंदूरे, रावसाहेब भिवसे, अरुण नलवडे, श्रीधर पाटील, आर. एल. चौगुले, आप्पासो चौगुले, केशव पाटील, गणेश चौगुले, एन. डी. वंदुरे, बाबुराव चौगुले, संजय चौगुले, दादासो सटवान, सार्थक पाटील, श्रीधर चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.