निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील काही नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गादेवीच्या मूर्तीचे दसर्यानंतर विसर्जन केले आहे. येथील कामगार चौकातील दुर्गा देवी उत्सव मंडळातर्फे शुक्रवारी (ता.7) महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. त्यानंतर बसव गोपाळ अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना जेवणाचे वाटप झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.
यावेळी सभापती राजू गुंदेशा, प्रणव मानवी, माजी नगरसेवक विजय टवळे, प्रणव मानवी, रवी कदम, रमेश वैद्य, मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, विकास चव्हाण, रोहित वैद्य, युवराज जाधव, सतीश शिरगावे, सौरभ वैद्य, प्रमोद जाधव, शुभम गिरी, ओंकार घाटगे, अथर्व वैद्य, संतोष साळुंखे, संदेश रेपे, अशोक फुटाणकर, निलेश वैद्य, चेतन राजपूत, ओंकार भोसले, सागर रेडेकर, नवीन निर्मळे, आदित्य घाटगे, संदीप घोडके, अतुल घोडके, सुमित जाधव, केशव कराळे यांच्यासह नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta