Wednesday , April 22 2026
Breaking News

स्वच्छतेचा खरा संदेश देणारे सफाई कामगारच

Spread the love

 

मुख्याधिकारी कल्याणशेट्टी : सफाई कामगारांची आरोग्य तपासणी
निपाणी (वार्ता) : मंदिरातील भगवंतांच्या नंतर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी आपण सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपले आरोग्य, घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. लोकांची सेवा करणारे हेच खरे सफाई कामगार आहेत. आपण शासकीय कर्मचारी असलो तरी तळागाळात पोहचून स्वच्छतेचा खरा संदेश देणारे हे सफाई कामगारच आहेत. त्यासाठी आपण सफाई कामगारांना त्यांनी करत असलेल्या कामांना प्रोत्साहन दिले तरच खर्‍या अर्थाने सफाई कामगार दिन साजरा केल्यासारखा होईल, असे मत बोरगांव नगर पंचायत मुख्याधिकारी पी. ए. कल्यानशेट्टी यांनी केले.
नगरपंचायत कार्यालयामध्ये नगरपंचायतीने सफाई कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
नागरिकांना कोणताच संसर्ग होऊ नये यासाठी शहरातील सफाई कामगार आपली जीवाची पर्वा न करता स्वच्छतेला प्राधान्य देत आहेत. गटार स्वच्छता, रस्ता परिसर स्वच्छता करून प्रामाणिकपणे कार्य केले आहे. आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त सफाई कामगारांना मुळेच असे मत नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सफाई कामगार दिनाचे औचित्य साधून सफाई कामगारांना अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. सफाई कर्मचार्‍यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची, व लिंबू चमचा असे विवीध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सफाई कामगारांनी मनोगत व्यक्त करून शहराच्या स्वच्छतेला आपण प्रामाणिक कार्य केल्याचे सांगितले. कार्यक्रमास राहुल गुडयीनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, महसूल निरीक्षक संदीप वाईंगडे, आरोग्य अधिकारी विलोल जोशी, नगसेवक दिगंबर कांबळे, शोभा हवले, बाबासाहेब चौगुले, अश्विनी पवार, गिरीजा वठारे, वर्षा मनगुते, भारती वसवाडे, विजय चौगुले, अमोल दत्तवाडी, निलेश उरणकर, जयपाल नेजे, रुकमन गजरे, हिम्मत अफराज, लक्ष्मण वडर, अरुण शिंगे, बाळाबाई कांबळे, हौसाबाई शिंगे यांच्यासह सफाई कामगार व कर्मचारी उपस्थित होते. गझाला जमाल यांनी सूत्रसंचालन केले. तर विजय चौगुले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *