दुचाकी ६.५० लाखाचा मुद्देमाल जप्त : सहा महिन्यानंतर घटनेचा छडा
निपाणी (वार्ता) : निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जत्राट- भिवशी मार्गावर ८ मार्च रोजी सराफी दुकान बंद करून जाणाऱ्या धोंडीराम विष्णू कुसाळे (रा.मांगूर) यांचा पाठलाग करून सहा दरोडेखरांनी त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने लुटून उसाच्या शेतात पोबारा केला होता. तब्बल सहा महिन्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून त्यांच्या जवळील दोन दुचाकी चार मोबाईल संच सह ६.७० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.
अक्षय अशोक कोंडीगिरे (वय २९ रा. मांगुर), पंकज संजू कोळी (वय २३ रा. सदलगा), प्रदीप अनिल कांबळे (वय २५ रा. बेडकीहाळ) आणि अवधूत भाऊसाहेब कोळी (वय २५ दोघेही रा. बेडकीहाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवराज यल्लाप्पा नाईक आणि प्रसाद सुरेश देसाई (दोघेही रा. बेडकीहाळ) अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मांगुर येथील सराफ व्यावसायिक धोंडीराम कुसाळे यांचे श्रीपेवाडी येथे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सायंकाळी आपले दुकान बंद करून सर्व साहित्य एका पिशवीत घेऊन मांगुर गावाकडे निघाले होते. त्यांच्यावर दरोडेखोरांनी पाळत ठेवून पाठलाग करून दिवशी हद्दीमध्ये त्यांना लुटले होते. कुसाळे यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण पाच ते सहा जण असल्याने कुसाळे यांनाच मारहाण करून ते ऊसाच्या शेतामध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर कुसाळे यांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली होती.
कुसाळे यांच्या दुकानात ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २.५० किलोचे दागिने होते.
आपल्या दुचाकीवरून मूळगावी मांगुर येथे चांदीचे वजनदार दागिने घेऊन जात असताना भिवशी गावच्या हद्दीमध्ये मोटारसायकलवरून तीन चोरटे आले. त्यांनी कुसाळे यांना अडवून मोटारसायकलवरून खाली पाडले व सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता.
या प्रकरणात चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक नंदीशा, ए. जी. तहसीलदार संजय कडागौडर, गोपाल बडिगेर, जी. टी. झारे, शेखर असोदे. एम. एफ. नदाफ, राघवेंद्र मेलगडे, प्रशांत कुडारी, शिवानंद सरवाड, विठला उगारे, रमेश भैरनवर यांनी जिल्हा तांत्रिक विभागाचे कर्मचारी सचिन पाटील, व सहकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
सहापैकी ४ आरोपी सापडले असून एकूण ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २.५०किग्रॅ चांदीचे दागिने असे एकूण ६ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखी दोन फरार आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला आहे. कारवाईबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी समाधान व्यक्त केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta