मंत्री शशिकला जोल्ले : निपाणीत वाल्मिकी कोळी जयंती
निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबधित राज्यांना कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील कोळी समाजाचे आरक्षण ३ टक्के वरून ७ टक्के केले आहे. ७५ वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न भाजप सरकारने सोडवून दाखवले आहेत. येथील वाल्मिकी समाजभवनाने तालुक्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अडचण लक्षात घेऊन पुढील काळात या भवनासाठी आणखी १० लाखांचा निधी देणार असल्याची ग्वाही राज्य धर्मादाय हाज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.
येथे निपाणी भाग कोळी समाजाच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती वाल्मिकी भवनात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी मंत्री जोल्ले प्रमुख पाहण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, प्रणव मानवी, सुनील वडगावे, रघुनाथ लठ्ठे उपस्थित होते.
सुनील कोळी यांनी स्वागत केले.
मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या, महर्षी वाल्मिकी हे थोर व्यक्तिमत्व होते. त्यांच्यामुळेच सर्वांना रामायणाची माहिती झाली आहे. धर्मादाय खाते आपल्याकडे आल्यापासून मठ, मंदिरांना मोठा निधी दिला आहे. यापुढील काळातही मंदिरांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे संत नगरी म्हणून परिचित असलेल्या येथील भवनांचे लवकरात हस्तांतरण केले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक संतोष सांगावकर, दीपक पाटील, दत्ता जोत्रे, आशा टवळे, रवी कदम, अभिनंदन मुदकुडे, विकास वासुदेव, प्रणव मानवी, रमेश वैद्य, मंगल सूर्यवंशी, चंपाबाई शिरगुप्पे, योगेश शिरगुप्पे, प्रमोद कोळी, मंजुळा पाटील, निर्मला ऐनापुरे, संदीप कोळी, युवराज प्रताप, समाजाचे अध्यक्ष उत्तम सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुधीर प्रताप यांच्यासह तालुक्यातील कोळी समाज बांधव, महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta