तिरंग्याच्या वेशभूषा अभूतपूर्व शोभायात्रा : दर्ग्यामध्ये महाप्रसादाचे वाटप
निपाणी (वार्ता) : येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अभुतपूर्व उत्साहात विविध उपक्रमांनीसाजरी करण्यात आली. सकाळी विशेष प्रार्थना होवून हजरत दस्तगीर साहेब दर्गाह मंडप येथून मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. सदर पदफेरीत राष्ट्रध्वज तिरंगा वेषभुशेत शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतला. मुलांनी तिरंगा ध्वज, पैगंबर जयंतीच्या निशाण्या फडकविल्या.
शोभायात्रा दर्गाह मंडप येथून सुरू होवून थळोबा पेठ, रविवार पेठ, गांधी चौक, गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, नेहरू चौक, जिजामाता चौक, भाट गल्ली मार्गे पुन्हा दर्गाह मंडप येथे येऊन समाप्त झाली. दर्गाह मंडप येथे अल्पोपहार, सरजत, थंडपेयाचे वितरण करण्यात आले.
यानंतर धर्मोपदेशक सय्यद निजामुद्दीन बुखारी यांनी प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान करून त्यांच्या माध्यमातून जगाला जीवन जगण्यासाठी आदर्श संहीता दिली. त्यानुसार प्रत्येकांनी अंगीकार केल्यास जीवन यशस्वी होईल, असे आशिर्वचन केले.त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. महात्मा गांधी रूग्णालयातील रुग्णांना सल्तनत ग्रुप वतीने मोफत फळांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी हाफिज अब्रार पठाण, हाजी दस्तगीर कमते, हाजी इलियास पटवेगार, दादाभाई देसाई, राज पठाण, वक्फ बोर्ड सदस्य शेरगुल पठाण, मैनोद्दीन मुल्ला, बख्तियार कोल्हापुरे, फारुक गवंडी, जुबेर बागवान, इम्तियाज मोकाशी, अड्डो पठाण, जमीर पठाण, मुजीब पठाण, समीर मुल्ला, जावेद मुल्ला, शकील मुजावर, इम्तियाज मुजावर, नसरा मकानदार, महंमद खानापूरे, जावेद कर्नाजी, जावेद फलटणकर, जावेद अव्दाल, बशीर हलगले, इर्शाद काझी यांच्यासह सहारा स्पोट्स क्लब, तहरिके मिनहाज हसेन, सेव्हन स्टार स्पोर्टस क्लब यांच्या सह विविध मंडळे, शालेय विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta