
चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम
कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
मंगळवार तारीख 11 रोजी कुर्ली, आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मान्यवरांच्या उपस्थितीत कर बांधण्यात आली. नियमित सकाळी सात वाजता व रात्री सात वाजता आरती व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रोज रात्री ढोल जागर (वालंग), पहाटे पालखी प्रदर्शना काढण्यात आली. गुरुवारी पहाटे भगवान ढोणे यांची पहिली भाकणूक झाली.
शुक्रवार तारीख 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी सात वाजता मानकरी, पुजारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आरती करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अनेक भाविकांनी दंडवत घातले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी आप्पाचीवाडी, कुरली येथील भाविकांनी गर्दी केली होती.
रात्री ढोल जागर वालंग, पालखी सबिना, पहाटे सिद्धार्थ ढोणे यांची मुख्य भाकणूक झाली. या भाकणूकी मध्ये सिद्धार्थ ढोणे यांनी पृथ्वीवरून औषधी वनस्पती नष्ट होईल, दीड महिन्याचे पीक कडधान्य येईल, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, महाराष्ट्र राज्यात नदी जोड प्रकल्प येईल, दुष्काळी भागाचे नंदनवन होईल, शर्यतीतील बसव्या तुम्हाला शाप देईल अशी नवीन भाकिते केली.
मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पीएसआय अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अन्नछत्र यांच्या वतीने यात्रा काळात भाविकांना महाप्रसादाची सोय केली होती.
सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेविका अश्विनी इंगवले काम पाहत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta