निपाणी(वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. कन्याकुमारी पासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु झाली. पुढे ती केरळमध्ये गेले. दोन्ही राज्यांत यात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून बर्याच लोकांनी, या राज्यांत काँग्रेसला जनाधार असल्याचा सूर लावला. या यात्रेमध्ये निपाणी तालुका व चिकोडी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
भाजपशासित कर्नाटकात काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे काँग्रेसच्या नेते मंडळींनी सांगितले.
गर्दीचे सगळे प्रस्थापित विक्रम मोडत ३९ व्या दिवशी राहुल गांधी व त्यांच्या सोबत चालणार्या जनसमुदायाने १००० किमी.चं अंतर चालून पूर्ण केले आहे. जगाला प्रेमाचा संदेश देणारी ही यात्रा अशाच प्रकारे पूर्णत्वाकडे जावी अशी सदिच्छा आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
देशाला प्रेम, समानता आणि न्यायाने एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या “भारत जोडो” यात्रेमध्ये चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी राहुल गांधी यांच्या सोबत त्यांनी बल्लारी येथे सहभाग घेतला होता.
त्यांच्या पदयात्रेत युवा नेते रोहन साळवे, निपाणी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, अरुण आवळेकर, सुनील हिरूगडे, अवधूत गुरव, अब्बास फरास, सुधाकर सोनाळकर, प्रकाश पोटजाळे, अस्लम शिकलगार, बाळासाहेब कमते, श्रीनिवास संकपाळ, संदीप इंगवले, प्रशांत हांडोरी, धीरज वाडकर, विशाल ढापळे, अमृत ढोले, माजी सभापती किरण कोकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta