यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला
निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे सर्वांचाच आनंद गगनाला भिडल्ययाचे दिसत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रदीप मोकाशी तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह उपस्थित होते.
प्रारंभी शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्वच यशस्वी खेळाडूंचे हलगीच्या वाद्यात स्वागत करण्यात आले.
जनता शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप मोकाशी म्हणाले, खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व ओळखून खेळाचा सराव करून आपले भविष्य उज्ज्वल करावे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्हालीबॉल संघातील आदित्य जाधव, श्रेयश तोंदले, प्रणव लोहार, श्रेयश रजपूत, शुभम हजारे, शंतनू रेपे, सुयश पाटील, सर्वेश देवनहळ्ळी, निखील शेवाळे, रुद्र ढोले, साई नागराळे, साहिल तुरंबेकर, तर
खो खो संघात श्रीकेश खवरे, प्रथमेश सूर्यवंशी, युगंधर माने, मृणाल खोत, रोहन खवरे, अथर्व पाटील, यश ठाणेकर, सौरभ चेचर, अथर्व खवरे, प्रवीण खोत, संघर्ष नाईकवाडे, पृथ्वीराज इंगवले या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावली त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
क्रीडा शिक्षक ए. एच. आळवे व व्ही. व्ही. पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी, शाळेची उज्जवल यशाची परंपरा कायम राखलेबद्दल खेळाडूंचे कौतुक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. डी. देसाई यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास एस. बी. पाटील, एस. एम. गोडबोले, शिक्षक प्रतिनिधी एस. एस. सांडगे, कर्मचारी प्रतिनिधी एस. के. कांबळे, माजी क्रीडाशिक्षक एस. आर. सोनाळकर, एस. एम. खांडके, कबीर वराळे यांच्या शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, यांच्यासह संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. समारंभाला प्रसिद्ध हलगी वादक हनुमंत घुले व सहकारी, तुतारी वादक शगुंडूराव हेगडे यांची साथ मिळाली. एस. के. बुच्चे यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस सांडगे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta