विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : भिवशी येथे युवा नेते उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते.
प्रारंभी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्रा. जोशी व मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. उत्तम पाटील यांना पुणे येथील युथ आयकॉन फॉर शुगर इंडस्स्ट्रिज पुरस्कार मिळाल्याबद्दल व चंद्रकांत शिवगोंडा पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, स्वाती रघुनाथ पाटील या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत सौंदलगा हायस्कूल मध्ये प्रथम, सानिका संजय पाटील हिने द्वितीय व क्षितिजा जीवन चौगुले हिने तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल व अनुजा गणपती पाटील उर्फ शेंडूरे हिने एमएससी मॅथेमॅटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल, वर्षा श्रीकांत बेनाडे हीने धावण्यामध्ये तालुका पातळीवर द्वितीय क्रमांक व अनिकेत लक्ष्मण कांबळे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल मानवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्य्यात आला.
यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, किरण पाटील, अजय पाटील, अमित शिंदे, संजीवनी म्हाळुंगे, जयवंत कांबळे, सोनू कदम, सचिन खोत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अशोक पाटील, शिवगोंडा पाटील, श्रीकांत देशमुख, विश्वास म्हाळुंगे, जयवंत पाटील, दिलीप पाटील, बबन भोसले, अमर पाटील, बजरंग बेनाडे, सचिन भिवशे, धीरु म्हाळुंगे, विक्रम शिंदे, पंकज कोरणे, अरुण बिरणगे, सौन्दलग्याचे सुदेश बागडी, रघुनाथ चौगुले, धनाजी पाटील, रोहित शेवाळे, प्रभाकर आरेकर, आप्पासो कारंडे, अमर सुतार, जैनवाडीचे नामदेव साळुंखे, बंडू खोत, संजय कांबळे, संदीप जोके, बुदिहाळचे अनिल संकपाळ, ममदापुरचे निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, संदीप तोडकर, अमलझरीचे अभिजीत कौंदाडे, तवंदीचे बाळासाहेब पाटील, यमगर्णीचे काकासाहेब कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta