निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित तवंदी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमधील मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक माणिक शिरगुप्पे यांना राज्यस्तरीय उत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बंगळुरू येथील शिक्षण खात्याच्या आयुक्त कार्यालयामधील सभा भवनात शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
माणिक शिरगुप्पे यांनी आज पर्यंत क्रीडा शिक्षक म्हणून प्रामाणिक व उत्तम कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संसथेचे अध्यक्ष, संचालक, सर्व सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta