उत्तम पाटील : सभासदांना लाभांश वाटप
निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले.
उत्तम पाटील यांनी, संघाकडून यावर्षी 2 लाख 97 हजार 734 दूध संकलन करण्यात आले आहे. त्याचबरोबर म्हैस खरेदीसाठी म्हणून दूध उत्पादकांना बिनव्याजी आडवांस म्हणून 22 लाख रुपये देण्यात आले आहे. दूध उत्पादक बरोबरच ग्राहकांनाही भेटवस्तू देणारी तालुक्यातील ही पहिलीच संस्था आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी दूध उत्पादकांना आपण उच्चंकी बोनस देत असतो. यावर्षी म्हैस दूध उत्पादकांना 5 टक्के व गाय दूध उत्पादकांना 4 टक्के बिन कपात बोनस दिले आहे. एकूण सभासदांना सुमारे पाच लाख दहा हजार रुपयांवर यावर्षी बोनस वितरण केले असल्याचे शेवटी उत्तम पाटील यांनी सांगून शहरातील सुमारे 1263 जनावरांना लाळखुरकत व 100 हून अधिक जनावरांना लंपिस्कीन लसीचे मोफत वितरण केले आहे. वासू संगोपन योजनेखाली मोफत वैद्यकीय सेवा, योग्य फॅटला योग्य दर, असे विविध योजना आपण संघाच्या वतीने देत असल्याचे सांगितले.
तसेच संघास सर्वाधिक दूध पुरवठा केलेल्या धोंडीराम कराळे, प्रकाश चव्हाण, कल्लू हवले, भरत अम्मान्नवर, भरत पाटील उमेश हेगळे यांचा सन्मान करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष मायगोंडा पाटील, उपाध्यक्ष शिवाजी तोडकर, संचालक शितल हवले, रमेश माळी, हिराचंद चव्हाण जयपाल कोरवी, अजित सावळवाडे,अनिल बुलबुले, सुदर्शन पाटील, सिकंदर आफराज, पि.के.पी.एस. संघाचे आर.टी.चौगुला, कृषी संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते, संचालक सुमित रोड्ड, दर्शन पाटील, तैमूर मुजावर, राजेंद्र ऐदमाळे, राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, प्रवीण पाटील, संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांच्यासह दूध उत्पादक ग्राहक व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta