विकासकामात आडकाठी आणल्याबद्दल उपोषण : अधिकाऱ्यांची भेट
निपाणी (वार्ता) : कारदगा (ता.निपाणी) येथील सत्ताधारी गटाच्या माध्यमातून विकास कामे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण या विकास कामामध्ये विरोधी गटाचे सदस्य जाणून बुजून आडकाठी आणून गावच्या विकासाला खीळ लावून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. विरोधक गावचा विकास करण्यासाठी कशा प्रकारे आडकाठी आणत आहेत याची सर्व माहिती ग्रामस्थांना कळावी यासाठी सत्ताधारी गटाचे सर्व सदस्य बुधवार (ता.१९) पासून ग्रामपंचायत समोर उपोषणस बसले होते. दुपारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनासह उद्योग खात्री योजनेचे अधिकारी उपोषण स्थळी भेट देऊन समस्या जाणून कामे करण्यासाठी होकार दिल्यावर सताधारी गटने उपोषण मागे घेतले. गावच्या विकासासाठी खुद्द ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यच उपोषणाला बसल्याने तालुक्यातील हि एक दुर्मिळ घटना घडली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटाच्या ईर्ष्या व द्वेषाच्या राजकारणामुळे गावच्या विकासाला खिळ घातली जात असल्याने नागरिकांच्या मधून संताप व्यक्त केला जात.
सकाळी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपोषणाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते. विविध घोषणाबाजी करुन विकास कामाला विरोध करणाऱ्यांचा धिक्कार करण्यात आला. उपोषणाला पाठींबा देण्यासाठी माजी आमदार सुभाष जोशी, बोरगाव येथील युवानेते उत्तम पाटील, रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार, यांनी भेट देवुन पाठिंबा दिला. सकाळपासून उपोषणात अनेक नागरिक सहभागी झाले होते. दुपारी लेखी आश्वासन अधिकाऱ्यानी देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्याची तयारी सत्ताधारी गटाने केली. विकास अधिकारी नंदकुमार फप्पे व उद्योग खात्री योजनेचे अधिकारी अनिल बाडगी यांनी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर सरबत घेवुन सत्ताधारी गटाने उपोषण सोडले.
यावेळी राजू खिचडे म्हणाले, ज्या विश्वासावर ग्रामस्थांनी आम्हाला निवडून दिले. त्या विश्वासाला पात्र राहून पक्षपात बाजूला ठेवून गावचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे.पण विरोधक सत्तेच्या जोरावर अधिकारी यांच्यावर दबाव आणून सर्व कामे थांबवली जात आहेत. त्यामुळे पाचकोटीचा निधी केवळ विरोधकांमुळे पडून आहे. यास विरोधक जबाबदार आहेत. विविध कामांचे अनुदान यांच्यामुळेच तटले आहे. त्यामुळे या लाभार्थी बरोबर गावचे नुकसान या विरोधी सदस्यांच्या मुळे होत असल्याचे सांगितले.
उपाध्यक्षा मंगल नाईक, माजी अध्यक्ष सुदिपसिंह उगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, किरण टाकळे, सुभाष ठकाणे, राहुल रत्नाकर, निवदूत धनगर, विनोद ढेंगे, पांडुरंग वंडर, ज्योती अलंकार, स्वाती कांबळे, वीरश्री खिचडे, रशीदा पटेल, पद्मा अलंकार, संगिता खोत, बाळ्ळव्वा दळवाई, संजय गावडे, ज्योती अलंकार, सचिन जाधव, रणजित हंडे, सुदीप कांबळे, लक्ष्मण माने, धोंडीराम काशीद, विजय कचरे, महादेव डांगे, प्रतिक कांबळे, पांडुरंग वड्डर, ईश्वर कुरणे, संभाजी कांबळे, रवी कांबळे, आनंदा चव्हाण, धोंडीराम काशीद, सुरेश आळते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta