शनिवारी पहाटे मुख्य भाकणूक : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कोगनोळी : येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त मंदिराचे रंगकाम व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंगळवार तारीख 18 रोजी मानकरी, पुजारी धनगर बांधव यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व योगेश पाटील यांच्या हस्ते कर बांधून यात्रेला प्रारंभ झाला आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री ढोल जागर वालंग झाला.
बुधवार तारीख 19 रोजी मंदिरात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री ढोल जागर वालंग व पालखी प्रदक्षिणा सबिना झाला.
गुरुवार तारीख 20 रोजी यात्रेच्या तिसर्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. रात्री ढोल जागर वालंग पहाटे पालखी प्रदक्षिणा, बाबुराव ढोणे व कृष्णात ढोणे यांची पहिली भाकणूक होणार आहे.
शुक्रवार तारीख 21 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी 9 वाजता भाजप पुरस्कृत विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, महानैवेद्य, रात्री ढोल जागर वालंग पहाटे पालखी प्रदक्षिणा व मुख्य भाकणूक होणार आहे.
शनिवार तारीख 22 रोजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी 9 वाजता बिरदेव यात्रा कमिटी यांच्यावतीने विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सदस्य सुनील कागले व अनिल पाटील उर्फ भैया समडोळे यांच्यावतीने 75 किलो झेंडूच्या फुलाचा हार अर्पण केला.
मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा मिठाई, साखर, कापूर, नारळ, आईस्क्रीम, भेळ, हॉटेल आदीची दुकाने थाटण्यात आली आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta