निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे कर्नाटकक महाराष्ट्र, गोवा या तिन्ही राज्यांच्या वतीने अंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा, बेळगाव येथे पार पडला. आश्रय नगर येथील मराठी मुलांच्या शाळेच्या शिक्षिका ताई दिनकर आरेकर त्यांना आंतरराज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रिय मंत्री रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगडे, बॅरिस्टर अमरसिंह पाटील, अरविंद बढी, पुण्याचे आमदार लंकेश, माजी आमदार संजय पाटील, राजस्थानचे प्रसिद्ध डॉक्टर कुणाल शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निपाणीमधील आश्रयनगर, आंदोलन नगर या मागास भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पूर्णपणे झोकून दिले आहे. ताई आरेकर या मुळ सौंदलगा या गावच्या रहिवाशी आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे त्यांचे निपाणी व परिसरातून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta