शहरासह ग्रामीण भागात गायीची पूजा : खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी (ता.२१) वसुबारसने दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र खरेदीला उधाण आले आहे. शुक्रवारी अनेक कुटुंबानी गाईला ओवाळणी करून नैवेद्य देऊन या उत्सवाची सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरणामुळे निर्बंध असल्याने हा सण उत्साहात साजरा करताना नव्हता. पण आता संसर्ग कमी झाल्याने यंदा दिवाळीमध्ये सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. सणाचा पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून निपाणी बाजारपेठेत संसार उपयोगी साहित्य सोने मोबाईल इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.
शनिवारी (ता.२२) धनत्रयोदशी आहे. त्यादिवशी वैद्यकीय मंडळी आपापल्या दवाखान्यात पूजा करणार आहेत.
रविवारी (ता.२३) नरकचतुर्दशी आहे.
सोमवारी (ता.२४) लक्ष्मीपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यवसायिक मंडळींची पूजेसाठी लगबग सुरू झाली आहे. मंगळवारी (ता.२५) दर्श अमावस्या व खंडग्रास सूर्यग्रहण आहे. बुधवारी (ता.२६) दीपावलीपाडवा अर्थात बलिप्रतिपदा व भाऊबीज साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने बहिणीला मोबाईल, संसार उपयोगी साहित्य खरेदीसाठी भावांची गडबड उडाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta