Wednesday , March 4 2026
Breaking News

सौंदलगा प्राथमिक कृषी पतीनकडून विक्रमी दूध बोनसचे वाटप

Spread the love

 

सौंदलगा : येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सुरू असलेल्या दूध विभागाकडून दूध उत्पादकांना दूध बोनसचे वाटप करण्यात आले.
यावेळी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, आज आम्ही गाय व म्हैस दूध उत्पादकांना 9 लाख 35 हजार रुपयांचा बोनस चे वाटप करीत असून संघाकडे एकूण 282 दूध उत्पादक आहेत. त्यांना या बोनसचे वाटप होणार आहे. म्हैशीसाठी वार्षिक बिलाच्या साडेसोळा टक्के तर गाईच्या वार्षिक बिलाच्या सहा टक्के प्रमाणे बोनसचे वाटप करीत आहोत. चालू वर्षात गाय व म्हैस यांचे वार्षिक दुध संकलन 1 लाख 56 हजार इतके झाले असून, यापुढेही दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त दुध पुरवठा करून संघास सहकार्य करावे.
यावेळी व्हाईस चेअरमन संजय आडसूळ, संचालक आप्पासाहेब ढवणे, डॉ. तानाजी पाटील, महादेव कांबळे, सबगोंडा पाटील, संभाजी साळुंखे, भारतसिंग रजपूत, राजश्री मोरे, विमल पाटील, अंजना नाईक, बी. आर. चौगुले, अण्णासाहेब पाटील, मोहन शेवाळे, दत्तात्रय हातकर, संजय पाटील, निवृत्ती काळुगडे, सिद्धू शिगावे, दत्तात्रय पाटील, यासह दूध उत्पादक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *