निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मनोहर सदाशिव हलगेकर (वय 40 रा. धूळगोणवाडी) असे या मजुराचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर विजेचे नवीन खांब आणि वाहिन्या जोडण्यात येत आहे त्याचे काम चिकोडी येथील कंत्राटदारांला दिले आहे. शनिवारी खांब आणि वाहिन्या बसवताना मनोहर हलगेकर हे खांबावर चढले होते त्याच वेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने ते खांबावरून वाहिन्यावर कोसळले व तिथेच लोंबकळत राहिले. तात्काळ त्यांना खाली उतरवून उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सायंकाळी उशिरा येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती. मृत मनोहर हलगेकर यांच्यामागे पत्नी, आई-वडील, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या या अकाली मृत्यूमुळे धुळगोनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …