तीर्थराज बाळासाहेब पाटील यांच्याकडून देणगी : बोरगाव येथे धनादेश सुपूर्द
निपाणी (वार्ता) : जैन समाजातील मुले उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी प्रयत्न करीत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या शिष्यवृत्ती फंडास वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव तीर्थराज बाळासाहेब पाटील (बेडकिहाळ) याच्याकडून सभेच्या शिष्यवृत्ती फडासाठी १ लाख रुपयांचा धनादेश सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
रावसाहेब पाटील यांनी, दक्षिण भारत जैन सभेने आरोग्य, संस्कार, शिक्षणावर अधिक भर दिलेला आहे. सभेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. समाजातील होतकरू, हुशार मुले उच्चशिक्षित होऊन त्यांनाही समाजातील संस्कार मिळावेत, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शिष्यवृत्ती योजना हाती घेतली आहे. ती समाजातील सर्व घटकाच्या शिक्षणासाठी आहे. बाळासाहेब यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांचा मुलगाही शिष्यवृत्ती योजनेतून उच्च निक्षित झाला. हैदराबाद येथील एका नामांकित कंपनीत तो नोकरी करीत आहे. त्याचा पहिला पगार आपल्या शिष्यवृत्ती योजनेस त्यांनी दिला. या वयात सामाजिक जाणिवेतून दातृत्वाची भावना निर्माण झाल्याबद्दल तीर्थराजचे कौतुक करून समाजातील नवयुवकांना या देणगीतून प्रेरणा मिळावी, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वीर सेवा दलाचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील, रावसाहेब बसण्णावर कर्मवीर मल्टिस्टेटचे व्हा. चेअरमन कुमार पाटील, समेचे विभागीय महामंत्री डॉ. रावसाहेब कुरे, अमय करोले, अशीक बंकापुरे, प्रकश जंगटे त्यांच्यासह वीर सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta